ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे विविध कार्यक्रम.

मालवणात खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तर्फे विविध कार्यक्रम.

प्रकाशन: 05 Apr 2025 01:19 PM
वाचन संख्या 151

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ; ९ एप्रिल रोजी बास्केटबॉल स्पर्धा, १० एप्रिल रोजी चार गटामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.

मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील निमंत्रीत संघांची टोपीवाला हायस्कूल येथे ९ एप्रिल रोजी बास्केटबॉल स्पर्धा, १० एप्रिल रोजी चार गटामध्ये मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर जिल्हापरिषद गटामध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही माहिती दिली.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व नेते अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजन वराडकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, नंदू देसाई, विक्रांत नाईक, दाजी सावजी, राजन गावकर, पप्पू सामंत, रवि टेंबुलकर, नारायण लुडबे, अमू हर्डिकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, पूजा वेरलकर, तारका चव्हाण, हरमळकर, प्रसाद चव्हाण व मान्यवर उपस्थित होते.

बुधवार, ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धा सुरु करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील नामांकित संघांना या स्पर्धेत पाचारण करण्यात येणार आहे. तर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पंधरा वर्षाखालील मुली (देऊळवाडा पूल ते कोळंब) प्रथम तीन क्रमांक ३०००, २००० व १००० रुपये व प्रशस्तीपत्रक, पंधरा वर्षांखालील मुलगे (देऊळवाडा पूल ते कोळंब) प्रथम तीन क्रमांक ३०००, २००० व १००० रुपये व प्रशस्तीपत्रक, महिला खुला गट (देऊळवाडा पूल ते कोळंब) प्रथम तीन क्रमांक ५०००, ३०००, व २००० रुपये व प्रशस्तीपत्रक, पुरुष खुला गट (देऊळवाडा पूल ते कोळंब ते देऊळवाडा पूल) प्रथम तीन क्रमांक ५०००, ३०००, व २००० रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पूजा वेरलकर ९४२१२३६२९०, तारका चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा. तर पुरुष गटासाठी ताराचंद पाटकर, ९९७५९८७५३०, ललित चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स