ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा.

प्रकाशन: 31 Mar 2025 03:06 PM
वाचन संख्या 116

अक्कलकोट | प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ( मुळस्थान ) येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभावाने व श्रद्धेने साजरा करण्यात आला.

पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती पुजारी मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत संपन्न झाली. यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले, त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होवून जन्म सोहळा संपन्न झाला.

यानंतर भजनगीत व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकटदीन सोहळा मोठया भक्तीभावात संपन्न झाला. यानंतर सर्व स्वामी भक्तांना जन्म सोहळ्याचे सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी – गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले. दुपारी ४ ते ६ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायनसेवा संपन्न झाली.

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आज दिवसभरात आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ, नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे व कर्मचारी, सेवेकरीसह पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते. याप्रसंगी प्रदीप हिंडोळे, बाळासाहेब घाटगे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर, बसवराज आलमद, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रामचंद्र समाणे, महेश मस्कले आदींसह असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स