ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वायंगणीत विविध विकासकामांचा शुभारंभ.

वायंगणीत विविध विकासकामांचा शुभारंभ.

प्रकाशन: 19 Mar 2025 05:05 PM
वाचन संख्या 212

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती.

आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडला. यासोबतच अन्य विकासकामांचा शुभारंभ तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, डॉ प्रमोद कोळंबकर, मनोज हडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या विकास कामांमध्ये खाबंलवाडी ते सडयेवाडी खडीकरण डांबरीकरण करणे, घाडीवाडी ते तोंडवळी फाटा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी येथे पेवर ब्लॉक बसवणे, घाडीवाडी येथे स्मशानशेड बांधणे या कामांचा समावेश आहे.

सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इतर मान्यवरांचे स्वागत करुन ग्रामदेवता श्री देव रवळनाथ चरणी गावाच्या विकासासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी वायंगणी सरपंच रूपेश पाटकर, मालवण तालुका प्रमुख महेश राणे, डॉ प्रमोद कोळंबकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, रावजी सावंत, सदा राणे, मंदार लुडबे, दिपक पाटकर, जयप्रकाश परूळेकर, संतोष मिराशी, मनोज हडकर, विलास परब, अण्णा धुळे, आनंद कांबळी, सुनील वायंगणकर, संतोष वायंगणकर, दामोदर वायंगणकर, तात्या दुखंडे, मोहन दुखंडे, हर्षद दुखंडे, कमलेश माळकर, रामदास प्रभू, विलास घाडीगांवकर, प्रदीप घाडीगांवकर, प्रसाद सावंत, एकनाथ सावंत, संदिप सावंत आदी उपस्थित होते.

विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरपंच रुपेश पाटकर यांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स