ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बालविश्व काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा १५ मार्च रोजी.

बालविश्व काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा १५ मार्च रोजी.

प्रकाशन: 05 Mar 2025 03:43 PM
वाचन संख्या 60

कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली येथील कवी किशोर डी. कदम यांच्या ‘बालविश्व’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा १५ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बालविश्व या बालकाव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे शनिवार १५ मार्च रोजी सायं. ४. ३० वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात संपन्न होईल.

किशोर डी. कदम ( कवी, बालविश्व काव्यसंग्रह)

कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कादंबरीकार तथा कोमसपाच्या केंद्रीय कार्यकारणी सल्लागार उषा परब यांच्या हस्ते बालविश्व काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य- सांस्कृतिक कार्यकर्ते ॲड. विलास परब, कोमसापाचे वरिष्ठ कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सचिव जेष्ठ कवी विठ्ठल कदम, साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स