शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका कार्यकारिणी बैठक.
वैभव नाईक, परशुराम उपरकर, सतीश सावंत, भाई गोवेकर, संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती.
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे उपस्थितीचे आवाहन.
ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक उद्या गुरुवार दि.०६/०३ /२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
( हरी खोबरेकर ( तालुकाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.)
या बैठकीला मालवण तालुक्यातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)