ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा.

प्रकाशन: 27 Feb 2025 06:10 PM
वाचन संख्या 86

महिला दिनाचे औचित्य.

मसुरे | प्रतिनिधी : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून वेताळ प्रतिष्ठान तुळस, वेंगुर्ला व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर -मेस्त्री, सांस्कृतिक मंच, मेस्त्रीवाडी, दाभोली, वेंगुर्ल्याच्या विद्यमाने महिला पोलिसांसाठी खुल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कठोर वर्दीत ममतेचा स्पर्श – महिला पोलिसांची दुहेरी जबाबदारी’, हा या स्पर्धेसाठीचा विषय आहे.

महिला पोलिसांनी किमान ७०० ते कमाल १००० शब्दांमध्ये मराठीत आपले विचार मांडायचे आहेत. सोबत महिला पोलिस असल्याचे पत्र जोडणे अनिवार्य आहे.

स्पर्धेची पारितोषिके : प्रथम क्रमांक – रोख ₹१०००, चषक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रोख ७००, चषक आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रोख ₹५००, चषक आणि प्रमाणपत्र,उत्तेजनार्थ प्रथम रोख २५०, चषक आणि प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ द्वितीय रोख २५०, चषक आणि प्रमाणपत्र.

स्पर्धेसाठी निबंध वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस,
द्वारा : प्रा. डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मु. पो. तुळस, ता. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, पिन – ४१६५१५, या पत्त्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष हाती खालील पत्त्यावर ०५ एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावा.

अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर – मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स