ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पालकमंत्री नितेश राणे यांनी यांनी आंगणेवाडी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा.

पालकमंत्री नितेश राणे यांनी यांनी आंगणेवाडी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा.

प्रकाशन: 21 Feb 2025 08:22 AM
वाचन संख्या 80

पोईप | प्रतिनिधी : आंगणेवाडी येथे विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेदरम्यान भाविकांना सर्व-सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकचा पोलिस बंदोबस्त पुरवावा तसेच सर्व परीसरात सीसीटीव्ही लावावेत. यात्राकाळात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

मसुरे, आंगणेवाडी वार्षिकोत्सव २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडीत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार वर्षा झाल्टे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री.राणे म्हणाले, स्थानिक देवस्थान समितीला प्रशासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल. भाविकांना सुलभ दर्शन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने जादा कुमक तैनात करावी, परिसरात अधिक प्रमाणात सीसीटीव्ही लावावेत, मंदिर परिसरावर ड्रोनव्दारे नजर ठेवावी, प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेसची व्यवस्था करावी, आपत्ती काळात गर्दीतून रुग्णवाहिका जाण्यासाठी आणि लवकरात लवकर बाहेर जाण्यासाठीचा मार्ग यावर आरोग्य विभाग आणि आरटीओ यांनी संयुक्त बैठक करून त्यावर नियोजन करण्यात यावे. तसेच व्हीआयपी आल्यावर सर्व सामान्यांना त्रास होता नये याचीही खबरदारी घेण्यात यावी. कोणत्याही प्रकारे भावकिांची गैरसोय होणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विशेष काळजी घ्यावी, आंगणेवाडी यात्रेला दरवर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता वीज वितरण, मोबाईल नेटवर्क, आरोग्य, पाणीपुरवठा, आवश्यक महत्वाच्या सर्व समस्यांवर पुढच्या यात्रेपर्यंत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स