ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
'कोमसाप गीत रचना' स्पर्धेचे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'कोमसाप गीत रचना' स्पर्धेचे आयोजन.

'कोमसाप गीत रचना' स्पर्धेचे आयोजन.


Article image


सावंतवाडी शाखा अध्यक्ष दीपक पटेकर यांचे सहभागाचे आवाहन 


सावंतवाडी | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषदे च्या (कोमसाप) वतीने संस्थेचे अधिकृत ‘कोमसाप गीत’ निश्चित करण्यासाठी एका गीत रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील नवोदित व ज्येष्ठ साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. परिषदेच्या प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक स्वरात गायले जाईल अशा गीताची निवड करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. 


या गीताद्वारे कोमसापची ओळख, मराठी साहित्याचा गौरव आणि कोकणची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधोरेखित केली जाणार आहे. गीत रचनेसाठी महत्त्वाच्या अटी व निकषांत गीत एकूण १२ ओळींचे असावे. (प्रत्येक कडव्यात ३ ओळी याप्रमाणे एकूण ४ कडवी), रचनेत कोमसापची वाटचाल व ध्येय, मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव, कोकणची निसर्गसमृद्धी (समुद्र, डोंगर, माती), साहित्यिक परंपरा, ज्ञान - सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समावेश असावा. तसेच रचना प्रेरणादायी, भावपूर्ण, ओजस्वी आणि सहज समूहगायन करता येईल अशी असावी. शब्द साधे पण साहित्यिक दर्जाचे असावेत. ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. प्रथम शाखा स्तरावर, त्यानंतर जिल्हा स्तरावर तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल. अंतिम फेरीत कोकणातील सातही जिल्ह्यांमधून निवडलेल्या सर्वोत्तम रचनांमधून परीक्षक मंडळाद्वारे एका उत्कृष्ट गीताची अधिकृत ‘कोमसाप गीत’ म्हणून निवड केली जाईल. निवड झालेल्या विजेत्या गीतकाराचा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सन्मान व गौरव करण्यात येणार आहे.


Article imageही स्पर्धा कोमसाप आजीव सदस्यांसाठी मर्यादित असल्याने सावंतवाडी तालुक्यातील कोमसापच्या सर्व आजीव सभासदांनी या अभिनव स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोमसापच्या वतीने सावंतवाडी शाखा अध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे. स्पर्धेसाठीचे गीत या ९४२१२३७५६८ वाॅटस् ॲप क्रमांकावर दिनांक १२ सप्टेंबर २०२६ पूर्वी पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स