पद्मश्री येती घरा..!
ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांची कवी रुजारीओ पिंटो यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
मालवण | प्रतिनिधी : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी मालवणचे साहित्यिक तथा कवी रुजारीओ पिंटो यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचे चिरंजीव श्री. अनुप कर्णिक व साहित्यिक रुजारीओ पिंटो यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या भेटीमुळे कोकणातील साहित्यिकांचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आपलेपणाने भेटले याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया साहित्यिक तथा कवी रुजारीओ पिंटो यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)