ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रिक्षा चालकांच्या गुणवंत मुलांचा व ज्येष्ठ रिक्षा चालकांचा २५ जानेवारी रोजी सत्कार.

रिक्षा चालकांच्या गुणवंत मुलांचा व ज्येष्ठ रिक्षा चालकांचा २५ जानेवारी रोजी सत्कार.

प्रकाशन: 24 Jan 2025 10:39 PM
वाचन संख्या 162

ब्यूरो न्यूज | कणकवली : जेम्स महाराष्ट्र, सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती, ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन, कणकवली रिक्षा स्टॅन्ड क्रमांक एक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रिक्षाचालकांची मुले इंजिनियर, डॉक्टर, वकील, किंवा आयटी सेक्टर, आयआयटीएन, नेव्ही, मिलक्ट्री, सीए किंवा उच्च पदावर कार्यरत आहेत आणि जे रिक्षा चालक तीस वर्षापेक्षा जास्त रिक्षा सेवा करत आहेत अशा ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सत्कार २५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कणकवली येथील गोपुरी आश्रम पर्यटन निवास केंद्र वागदे येथे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, महामार्ग सुरक्षा पथक कणकवली पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, जेम्स महाराष्ट्र झोनचे अधीक्षक रेव्ह संजय पन्हाळकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी विलास बगडे, जेम्स कोकण कम्युनिटी केअर वर्कर्सचे अमित पोवार तसेच ख्रिश्चन शांतता समितीचे अनंत चौगुले, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमित पोवार, संतोष नाईक, सुधीर पराडकर, मंगेश सावंत, मिलिंद सावंत, शरद साटम, रविकांत चांदोसकर, सचिन तळेकर, महेंद्र सावंत, सुनील पाताडे, राजेश बांदेकर, संदीप सावंत, एकनाथ राऊळ, राजकुमार तळेकर, रवी माने, यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स