ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सौ. अमिता भांबल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

सौ. अमिता भांबल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 24 Jan 2025 09:48 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्रतिनिधी : जि. प. प्राथमिक शाळा, घुमडे, तालुका मालवण च्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका सौ. अमिता अमित भांबल यांना शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमिता भांबल यांना यापूर्वी सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. अनेक शालेय उपक्रम, शाळाबाह्य उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनोखी क्रांती केली आहे. शालेय विविध स्पर्धा, विविध उपक्रमांना त्यांनी मार्गदर्शक शिक्षिका म्हणून नाव मिळविले आहे. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या वतीने दखल घेऊन सौ. अमिता भांबल याना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन ओरोस येथे पार पडले. शिक्षक भारती संघटनेचे राज्यसंघटक किसन दुखंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचा व आदर्श शाळांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सन्मा. किसन दुखंडे, माजी. जिल्हा परिषद सदस्य श्री. सुधीर नकाशे, भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, कुडाळ पंचायत समिती माजी सदस्या सौ. सुप्रिया वालावलकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, शिक्षक भारती संघटना मालवण तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. अमिता भांबल म्हणाल्यात मिळालेला पुरस्कार हा माझा नसून तुम्हा सर्वांचा आहे. या पुढेही मी प्रामाणिकपणे शिक्षकी सेवा करत राहणार आहे. विद्यार्थी, सहकारी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, सर्व अधिकारी वर्ग, आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही माझी शाळा आणि सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीने नावारूपास आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी शिक्षक भारती संघटनेचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स