ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सेनापती नितेशजी राणे यांच्या हाती ड्रोनास्त्र : रविकिरण तोरसकर.

सेनापती नितेशजी राणे यांच्या हाती ड्रोनास्त्र : रविकिरण तोरसकर.

प्रकाशन: 12 Jan 2025 02:43 PM
वाचन संख्या 67

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी देशातील पहिल्या ड्रोन प्रणालीची सुरुवात नुकतीच आदरणीय मत्स्य उद्योग मंत्री श्री नितेश राणे यांच्या हस्ते झाली .अनधिकृत मासेमारी, त्याचबरोबर परप्रांतीय मच्छीमारांची वाढती झुंडशाहीला शह देण्यासाठी एक यंत्रणा अस्तित्वात येणे गरजेचे होते. तसेच सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते. सदर दोन्ही हेतू साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्योद्योग मंत्री सेनापती नितेशजी राणे यांनी आपल्या हाती ड्रोन रुपी पाहिले अस्त्र आपल्या भात्यातून बाहेर काढले आहे. मत्स्य व्यवसाय खात्याचा कारभार सांभाळल्यानंतर गस्ती नौका आणि ड्रोन प्रणाली याबाबत तातडीने पावले उचलून भविष्यातील वेगवान निर्णयांची चाहूल मत्स्य क्षेत्राला दाखवून दिली आहे असे भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.

अतिशय उच्च तंत्रज्ञानाने युक्त असे ड्रोन महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर व जलधीक्षेत्रामध्ये लक्ष ठेवणार आहे .सेनापती नितेश राणे यांनी हाती घेतलेले ड्रोनास्त्र सुरक्षा, पर्यावरण,मत्स्य या म्हणजेच Security Environment Fisheries(SEF) या तिन्ही क्षेत्र SAFE ठेवण्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे. तसेच मत्स्य क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी यांना त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अदृश्य ड्रोन ची सूचक इशारा देऊन सेनापती नितेश राणे यांनी आपल्या सैन्याला भविष्यातील वाटचालीची दिशा दाखवली आहे. .महाराष्ट्रातील पारंपारिक मच्छीमार,सागरी पर्यावरण वादी तसेच मत्स्यव्यवसाय मत्स्य उद्योग मंत्री सेनापती नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स