ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
हनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 06 Jan 2025 11:05 PM
वाचन संख्या 60

आचरा | प्रतिनिधी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांच्या वतीने दिला जाणारा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार जि.प. केंद्रशाळा खांबाळे नं. १, ता. वैभववाडी या शाळेतील उपशिक्षक श्री. हनुमंत तुकाराम सुतार यांना आचरे येथे विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पेडणेकर म्हणाले की ‘सेवामयी पुरस्कार’ या नावातच विद्यार्थी, शाळा, समाज यांची नि:स्वार्थी सेवा आहे. साने गुरुजींच्या तत्वांवर चालून शाळा समाजात व समाज शाळेपर्यंत येण्यासाठी धडपडत रहा. सुतार सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक करीत असलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. कथामाला मालवणचे कार्यही आदर्शवत असेच आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन कै. जी. टी. गावकर आप्तेष्ट, कोकण व कोल्हापूर मित्रमंडळ अजयकुमार वराडकर, मोहन गावकर, राजू दुखंडे, कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपीठावर निवड समिती अध्यक्ष सदानंद कांबळी, मुख्याध्यापिका शेट्ये, यशवंत कांबळी, व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियांका पवार, अरविंद गावकर कुटुंबीय उपस्थित होते.

केंद्रशाळा खांबाळे नं.१ या शाळेतील कथामालेच्या विविध उपक्रमांसाठी या शाळेची आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड करण्यात आली. त्यांना कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना हनुमंत सुतार म्हणाले, कथामाला उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्यांची जोपासना होण्यास फार मदत झाली. शाळेतील सर्व शिक्षकांच्या एकत्रित कार्यामुळे विविध उपक्रमांमध्ये यश मिळत असते. त्यासाठी कथामाला मालवणने केलेले कौतुक प्रेरणादायी आहे.

पांडुरंग कोचरेकर यांनी श्री. सुतार सर यांच्या कार्याचा परिचय करून दिला. उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे याने विशेष संदेशाद्वारे श्री. सुतार सर यांचे अभिनंदन केले. गुरुनाथ ताम्हणकर यांनी कथामाला मालवणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी दत्तात्रय हिर्लेकर गुरुजी, अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, पडवळ, माधव गावकर, चंद्रशेखर धानजी, त्रिंबक आजगावकर, चंद्रशेखर हडप, भानू तळगावकर, विजय चौकेकर, स्मिता जोशी, श्रृती गोगटे, अमृता मांजरेकर, संजय परब, मनाली फाटक, देवयानी आजगावकर, रश्मी आंगणे, उज्वला धानजी, गिरीधर पुजारे, भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, रसिका तेंडोलकर, परशुराम गुरव, तेजल ताम्हणकर, आचरे नं. १ शाळेच्या शिक्षक, सायली परब, आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते. रामचंद्र कुबल यांनी सूत्रसंचालन केले तर सुगंधा गुरव यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स