ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पैशांनी व मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग मालकाच्या स्वाधीन.

पैशांनी व मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग मालकाच्या स्वाधीन.

प्रकाशन: 06 Jan 2025 10:14 PM
वाचन संख्या 376

मालवण पोलिसांची तत्परता व सुजाण नागरीकांच्या प्रामाणिकपणा बद्दल बॅग मालकाने मानले आभार.

मालवण | प्रतिनिधी : दिनांक ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास इव्हिनिंग वॉक साठी जाणाऱ्या श्रद्धा सुंदर बांदेकर ( वय ६१, राहणार कोळंब ) मधली वाडी यांना हडकर स्टॉप नजीकच्या गॅरेज समोरील रस्त्यावर एक छोटी पाउच वजा बॅग पडलेली दिसली. ती बॅग त्यांनी तिथे जवळ असलेले गॅरेज मेकॅनिक सतीश पवार यांना दाखवली. दोघांनी बॅग उघडुन बघितली असता त्या बॅगमध्ये बरेच पैसे आणि दोन मौल्यवान घड्याळे असलेली दिसली. त्यांनी ही बॅग एका जबाबदार नागरिकाप्रमाणे पोलिस स्टेशनला नेऊन देऊया असे ठरवले आणि प्रामाणिकपणे मालवण पोलीस ठाणे येथे आणून जमा केली.

त्यानंतर ठाणे अंमलदार गणेश शिंदे यांनी सदर हकिगत तात्काळ पोलिस निरीक्षक कोल्हे यांना कळवली. मालवण पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांनी आपल्या स्टाफला सदर बॅग मालकाचा शोध घेण्याचे तात्काळ आदेश दिले. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री .माने , पी एस आय संदीप खाडे, पी एस आय आनंद यशवंते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर ,पोलीस हवालदार सुशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुहाडे, यांच्या पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हलवून सदर बॅग ची कसून तपासणी केली. तेव्हा त्या बॅगमध्ये रोख रूपये ९५.००० ( पंच्चाण्णव हजार रुपये) तसेच सुमारे ७५.००० ( पंच्चाहत्तर हजार) रूपये किंमतीची दोन घड्याळे व इतर किरकोळ वस्तू सापडून आल्या.

ही बॅग अधिक तपासून पहाता त्यात बर्डोली, राज्य गुजरात येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले असल्याची पावती आढळून आली. त्याद्वारे पोलिस हवालदार सुशांत पवार यांनी तात्काळ त्यावर नमूद गाडी नंबर MH-04 -JM- 5156 द्वारे सदर गाडी मालकांचा मोबाइल नंबर मिळवला व त्यांनी सदर नंबर वर कॉल केला असता सदर नंबर हा मुंबई येथील जय कापडिया यांचा असल्याचे समजले. पवार यांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपण मुंबई येथे असून सदर गाडी घेउन त्यांचे वडिल मनोज जसवंतलाल कापडिया हे मालवण येथे कामानिमित्त गेलेले आहेत व रेवंडी येथील माई रिसॉर्टवर थांबलेले आहेत असे सांगितले. पवार यांनी सदर माहिती पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांना कळविली.

श्री कोल्हे साहेबांनी माई रिसॉर्ट येथे संपर्क करून सदर बॅग मालक यांच्याशी त्यांच्या बॅग बाबत शहानिशा करून बॅग मालक मनोज जसवंतलाल कापडिया यांना पोलिस ठाणे येथे बोलावून घेतले. आणि सदर बॅग ची ओळख पटवून ती बॅग त्यांचीच असल्याची खात्री करून सिंधुदुर्ग पोलिसांच्या माध्यमातून ती बॅग प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोळंब येथील सतिश पवार या मेकॅनिकच्या हस्ते मूळ मालकाला परत करण्यात आली.

बॅग मालक मनोज जसवंतलाल कापडिया, मालाड मुंबई यांनी जगात आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा अनुभवण्यास मिळाला ही आपल्यासाठी सुखद आणि अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगितले.

तसेच बॅग परत करणाऱ्या श्रद्धा सुंदर बांदेकर रा. कोळंब मधली वाडी, मेकॅनिक सतीश पवार रा. कुंभारमाठ तसेच सिंधुदूर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. मा. सौरभ कुमार अग्रवाल यांचे त्याचप्रमाणे मालवण पोलिस स्टेशनचे ऋणी असल्याच्या भावना श्री कापडिया यांनी व्यक्त केल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स