धोकादायक व नादुरूस्त साकव ; ओहोळातून साकारला पर्यायी मार्ग..!
पळसंब गावठणवाडीतील मंडळींची नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जपलेली सामाजिक बांधिलकी.
माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, श्री गिरीधर पुजारे व सहकारी मंडळी यांचे योगदान.
संपादकीय : नवीन वर्षाचे औचित्य साधून, पळसंब गावच्या गावठण वाडीतील मंडळींनी श्रमदानाने झरिच्या व्हाळातून ( ओहोळातून) मार्ग साकारत वाट काढली. कुठल्याही सरकारी घटकाचे सहाय्य न घेता हे काम करण्यात आल्याचे समजते. यासाठी स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थ मंडळीचे सहकार्य व योगदान लाभले. या झरिच्या वहाळावरील साकव अनेक दिवस धोकादायक असून तो नादुरुस्त आहे त्यामुळे पर्यायी मार्ग आवश्यक होता.
वरील पहिल्या फोटोंत धोकादायक साकव. ( व्हाळातील छोटे मोठे दगड हाताने तथा श्रमदानाने बाजुला करण्यात आले) दुसर्या फोटोत मध्यभागी डावीकडे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व उजवीकडे श्री गिरीधर पुजारे आणि सहकारी मंडळी
यावेळी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, श्री. गिरीधर पुजारे, प्रमोद सावंत, उल्हास सावंत, अरूण पुजारे, राजन पुजारे, दिवाकर पुजारे, अशोक जुवेकर, तात्या सावंत, वैभव परब, नरहरी सावंत, संजय पळसंबकर, गणपत पुजारे, सुरेश लाड, गणेश पुजारे, रामकृष्ण पुजारे, राजाराम गोलतकर, नरहरी सावंत, अनिल परब, तसेच महिला धनश्री पुजारे, रचना पुजारे, पल्लवी सावंत, अक्षता परब, श्री. मांजरेकर यांची उपस्थिती होती.
माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व ज्येष्ठ नागरीक श्री गिरीधर पुजारे यांच्या सहकार्याने या कामाचे नियोजन करण्यात आले.
व्हाळातून साकारलेली पायवाट.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)