बोर्डिंग ग्राउंडवर वर्षभर धूळ खात पडलेला हायमास्ट टाॅवर पुन्हा उभारून कार्यान्वीत.
आमदार निलेश राणे इफेक्ट.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या तक्रारीची दखल.
मालवण | प्रतिनिधी : नौदल दिनानिमित्त (४ नोव्हेंबर २०२३) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दोर्यावेळी हेलिकाप्टर लॅन्डिंग सुरक्षेसाठी मालवणच्या टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंड मैदानावरील हायमास्ट टाॅवर, नगरपरीषद प्रशासनाकडून उतरवून खाली ठेवण्यात आला होता. तो हायमास्ट टाॅवर आता पुनश्च उभारुन कार्यान्वीत तथा प्रकाशमान झाला आहे. नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपरीषद सभागृहातल्या शहरविकास आढावा बैठकीत यासंदर्भात संबंधित अधिकारी तथा यंत्रणेला याबाबत निर्देश दिले होते
(आमदार निलेश राणे नगरपरीषद सभागृहात शहर विकास आढावा घेताना.)
दरम्यान लाखो रुपये खर्चलेल्या, त्या वर्षभर धूळ खात पडलेल्या हायमास्ट टाॅवरच्या उभारणीसाठी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर यांनी संबंधित यंत्रणांचे वारंवार लक्ष वेधले होते.
हायमास्ट टाॅवर पुन्हा उभारल्याने पहाटे व ज्येष्ठ नागरीक, मुले, चालण्याच्या व्यायामासाठी येणारे नागरीक तसेच ॲथलीट यांना दिलासा मिळणार आहे. त्या हायमास्ट टाॅवरची उभारणी म्हणजे कुडाळ मालवणचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांच्या शहरविकास आढावा बैठकीचा ‘तत्काळ इफेक्ट’ असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिली आहे.
बोर्डिंग ग्राउंडवर पुन्हा उभारलेला टाॅवर
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)