पोईप हायस्कूलसाठी खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून चार वर्ग खोल्या बांधुन देण्याची लवकरच पूर्तता : दत्ता सामंत.
पोईप येथे प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभात उद्योजक दत्ता सामंत मान्यवर उद्घाटक म्हणून उपस्थित.
प्रशालेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल केले अभिनंदन.
पोईप | प्रतिनिधी : मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरणचे वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक श्री दत्ता सामंत, प्रयोगशाळा देणगीदार आर डी परब, उद्योजक सुरेश नेरुरकर, पोईप संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, पोईप सरपंच श्रीधर नाईक, सनदी लेखापाल सुहास पालव, संस्था सचिव विलास माधव, संस्था संचालक महेंद्र पालव,महेश पालव, सत्यवान पालव,कमलेश प्रभू, विश्वनाथ पालव, नामदेव पुजारे, मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर, संजय माधव, अरूण भोगले, पोईप पोलिस पाटील अविनाश जाधव, बाबुराव चिरमुले, अरूण मेस्त्री, डॉ हर्षल परब, डॉ सुनिल परब, डॉ अस्मिता परब, मुख्याध्यापक विकास कुंभार,हेदुळ सरपंच प्रतिक्षा पांचाळ, वायगवडे सरपंच विशाखा सकपाळ,व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले की जिल्ह्यातील काही मोजक्या शाळांमध्ये पोईप हायस्कूलचे नाव असून पोईप हायस्कूलचे संस्था संचालक सर्व शिक्षक यांनी पोईप हायस्कूलच्या यशात नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. यामुळे पोईप हायस्कूलचे विद्यार्थी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यांमध्ये नावारुपास येत आहेत याबद्दल आपण संस्था सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करत आहोत मागील कित्येक वर्षांपासून पोईप हायस्कूल इमारत वर्ग खोल्यांसाठी संस्था व ग्रामस्थांनी आपल्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. मात्र शासकीय निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आपण खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून इमारतीसाठी चार वर्ग खोल्या बांधून देणार असुन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या चार वर्ग खोल्यांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यासाठी आपण प्रयत्नशील असुन यापुढे देखिल पोईप हायस्कूलसाठी सहकार्य करु असे दत्ता सामंत यांनी सांगितले.
तसेच यावेळी बोलताना सनदी लेखापाल सुहास पालव म्हणाले की १९६२ सांली पोईप हायस्कूल सुरू झाले असून जवळपास ६० वर्षे इमारत बांधकामाला झाली आहे. सदर इमारत जिर्ण झाली असुन इमारतीचे नूतनीकरण होणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपण स्वतः व सुरेश नेरुरकर मिळुन दोन वर्ग खोल्या बांधून हायस्कूलसाठी देणार आहोत. तसेच या प्रशालेत शिक्षण घेवुन विविध पदानवर व व्यवसात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या पुढे माजी विद्यार्थी संघ स्थापन करून विद्यार्थी एकत्रित होऊन निधी संकलन करून शाळेसाठी आर्थिक मदतीचे योगदान दिल्यास शाळा सुसज्ज होण्यस मदत होईल यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानी आपण प्रशालेचे काही देणे लागत असुन जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी प्रशालेला आपल्या परीने सहकार्य करण्याचे आवाहन सनदी लेखापाल सुहास पालव यांनी दिले.
यावेळी पोईप संस्था व हायस्कूल यांच्यावतीने उपस्थित मान्यवरांच शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील इयत्ता ५ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व क्रीडा विभागात उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ केतकी सावंत, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री विकास कुंभार तर आभार कांराडे यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)