ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
बांदा येथे २९ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर.

बांदा येथे २९ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर.

प्रकाशन: 28 Dec 2024 12:48 AM
वाचन संख्या 74

दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांचे आयोजन.

बांदा | राकेश परब : दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येथील पीएम श्री बांदा केंद्रशाळा नं. १ येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयाची रक्तपेढी रक्त संकलन करणार आहे. लग्नसराई, सण, उत्सव यामुळे शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. बांबोळी रक्तपेढीत केवळ ३५ टक्के रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. अपघात तसेच दैनंदिन रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता असते. हि तूट भरून काढण्यासाठीच बांद्यात रक्तदान शिबीर घेण्यात येत असल्याचे श्री लाड यांनी सांगितले.

या शिबिरासाठी सिंधुदुर्गसह संपूर्ण राज्यात रक्तदान, अवयवदान व देहदान हि संकल्पना प्रत्यक्षात राबविणारे सिंधु रक्त प्रतिष्ठान सहकार्य करणार आहे. रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचा एक भाग असून या पवित्र कार्यात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय मयेकर, युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार निलेश मोरजकर, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, कर सल्लागार समीर परब, राकेश परब आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स