ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात.

आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात.

प्रकाशन: 28 Dec 2024 12:35 AM
वाचन संख्या 41

मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई आयोजित १४ वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भांडुप येथील गीता हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाले. श्री. सतीश कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अग्निशमन दलाचे अधिकारी रतनकुमार झाजम हे प्रमुख पाहुणे तर अमोल सरतांडेल व पांडुरंग भाबल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मंडळाचे संस्थापक धर्माजी पराडकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्रीं च्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून संमेलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी यांचे गुणाजी पोसम यांनी स्वागत व परिचय करून दिला. अजित पराडकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

प्रारंभी मंडळाच्या मृत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या नंतर मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा. पो. उपनिरीक्षक दिगंबर तारी यांचा सपत्नीक तसेच माध्यमिक, शालांत, उच्च माध्यमिक व वैद्यकीय पदवीधर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्षांनी स्नेहसंमेलन आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करून मंडळाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर धर्माजी पराडकर यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ, देणगीदार, पाहुणे व पदाधिकारी यांचे आभार मानले.

महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ पार पडल्यावर महिला व लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम धनंजय मुणगेकर व गुणाजी पोसम यांनी आपल्या खुमासदार शैलीत सादर केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स