ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नूतन वर्षाचे स्वागत.

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नूतन वर्षाचे स्वागत.

प्रकाशन: 27 Dec 2024 11:57 PM
वाचन संख्या 107

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; चेअरमन महेश इंगळे यांची माहिती.

मसुरे | प्रतिनिधी : नूतन वर्षाच्या स्वागताकरीता कोल्हापूर, मुंबई व राज्यातील विविध भागातील स्वामी भक्तांच्या वतीने अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात सालाबादाप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांनी हर्षोल्हासात नुतन वर्षाचे स्वागत होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

श्री महेश इंगळे ( चेअरमन, वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिर समिती, अक्कलकोट )

मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी नुतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व नविन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, सांगली इत्यादी भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून व देशभराच्या अन्य ठिकाणांहून बरेच स्वामी भक्त येणार आहेत. दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ यांचे भजन, व विविधरुपी सोंगी भारूड इत्यादी कार्यक्रम देवस्थान परिसरात होतील. रात्री ७:४५ वाजता महाराजांच्या शेजारतीस सुरुवात होईल. रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील भजनी मंडळाचे नविन वर्षाच्या स्वागताचे भजन व भावभक्तीगीतांचा कार्यक्रम देवस्थान व परिसरात होतील. दि: ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता कोल्हापूर व मुंबई येथील स्वामी भक्तांच्या वतीने गोड प्रसादाचे पदार्थ वाटप करुन व फटाक्यांची आतषबाजी करुन असंख्य स्वामी भक्तांच्या मुखाने ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय’ या जयघोषाने सन २०२५ या नविन वर्षाचे स्वागत केले जाईल. याप्रसंगी उपस्थित सर्व स्वामी भक्त शुभेच्छा व्यक्त करतील व या शुभमुहूर्ताप्रसंगी स्वामींच्या चरणी नतमस्तक होवून येणारे नविन वर्ष सुख समृध्दीने व भरभराटीने व्यतीत व्हावे याकरिता समर्थांच्या चरणी साकडे घालुन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात येईल. दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत भजन भारूड इत्यादी धार्मिक कार्यक्रम होतील. या प्रसंगी सर्व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरीता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता दिनांक ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी मंदिरात स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. स्वामी भक्तांच्या दर्शनाकरीता देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त भाविकांनी नूतन वर्षानिमीत्त आयोजित या कार्यक्रमांचा लाभ घेवून व नूतन वर्षानिमित्त समर्थांचे दर्शन घेवून स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स