ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आचरा येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते तालुकास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन.

आचरा येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते तालुकास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन.

प्रकाशन: 23 Dec 2024 06:08 PM
वाचन संख्या 218

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मान्यवरांची उपस्थिती.

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे तालुकास्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. निलेश राणे म्हणाले की विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखून त्याप्रमाणे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात आपल्या भागातून नावलौकिक प्राप्त खेळाडू बनण्यास वेळ लागणार नाही.

यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दी आचरा पीपल्स असोसिएशन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, गटशिक्षणाधिकारी संजय माने, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, संजय मिराशी, स्थानिक स्कूल समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, महेश परब यांसह सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ निलेश राणे यांनी आमदार झाल्या नंतर पहिल्यांदाच आचरा हायस्कूल येथे कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. दि आचरा पीपल्स या संस्थेला १०८ वर्ष झाली आहेत. इतकी वर्षे ही संस्था विद्यार्थ्यांच्या हिताचे काम करत आहे हे कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी संस्थेच्या हितासाठी सर्व तो परी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स