ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात १९ व्या आविष्कार संशोधन महोत्सवाचे यशस्वी आयोजन.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात १९ व्या आविष्कार संशोधन महोत्सवाचे यशस्वी आयोजन.

प्रकाशन: 15 Dec 2024 09:21 AM
वाचन संख्या 192

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील चार प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड.

मालवण | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात १९ व्या अविष्कार संशोधन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. या आंतर – महाविद्यालयीन संशोधन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरातील एकूण ६८ संघांतील १३८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत सहा विभागांसाठी १३ परीक्षकांनी सखोल परीक्षण करून निकाल जाहीर केला. मानव्यशास्त्र, भाषा आणि ललित कला विभागासाठी डॉ. सचिन लबडे, डॉ. राजेश भोईटे, आणि डॉ. पांडुरंग चौधरी यांनी परीक्षण केले. वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा विभागासाठी डॉ. राज सोष्टे, डॉ. राहुल शेट्टी, आणि डॉ. सम्राट जाधव यांनी योगदान दिले. Pure Science विभागासाठी डॉ. विशाल कांबळे, डॉ. राजाराम गुरव आणि डॉ. रोहन जाधव यांनी परीक्षण केले. कृषी व प्राणीपालन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वैद्यकशास्त्र व फार्मसी विभागासाठी डॉ. विनोद गोकर्ण, डॉ. रोहन गावंकर, डॉ. प्रज्ञा कोर्लेकर, आणि डॉ. योगेश गजमल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय फेरीत विविध विभागांमधून निवडलेली महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत.
मानव्यशास्त्र, भाषा आणि ललित कला (UG) :
संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ.
कणकवली महाविद्यालय, कणकवली
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी.
कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट.

कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ (UG) : एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण (2 संघ)

Pure Science (UG):
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी
एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण
आनंदीबाई राव राणे कला व वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी.

Pure Science (PG):
श्री एस. एच. केळकर महाविद्यालय, देवगड.
आनंदीबाई राव राणे महाविद्यालय, वैभववाडी.
संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ.

कृषी व पशुपालन (UG):
आनंदीबाई राव राणे महाविद्यालय, वैभववाडी.
कणकवली महाविद्यालय, कणकवली.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (UG):
संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी.

मेडिसिन व फार्मसी (UG):
कणकवली महाविद्यालय, कणकवली.

बक्षीस वितरण सोहळ्यात मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, परीक्षक डॉ. प्रज्ञा कोर्लेकर, जिल्हा समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर शिरसाट, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. आशिष नाईक, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. कैलास राबते, आणि प्रा. प्रमोद खरात आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाना बक्षीस वितरण करण्यात आले. डॉ. प्रज्ञा कोर्लेकर यांनी नवसंशोधक विद्यार्थ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन केले. डॉ. सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील विद्यापीठ स्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुमेधा नाईक, सर्व सीनियर व जूनियर विभाग प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स, आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रतिनिधी कुमारी निकिता शर्मा आणि सौरभ चव्हाण यांनी विशेष योगदान दिले. कृ.सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव श्री चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲडवोकेट समीर गव्हाणकर, तसेच इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी या अविष्कार संशोधन स्पर्धेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या भव्य संशोधन महोत्सवाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयीची जिज्ञासा आणि नवनवीन संधींचा शोध यासाठी प्रेरणा निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया सहभागींनी व्यक्त केली.

आविष्कार संशोधन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ अध्यक्ष श्री चंद्रशेखर कुशे, मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक सुनील पाटील, छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र प्रमुख डाॅ. राजाराम गुरव, प्राचार्य डाॅ शिवराम ठाकूर, जिल्हा समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर शिरसाट, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. आशिष नाईक, डाॅ सुमेधा नाईक व सूत्रसंचालक प्रा. प्रमोद खरात.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स