ताज्या बातम्या
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
मानवी अधिकार दिना निमित्त महिला व त्यांचे मानवाधिकार विषयावर वेंगुर्लेत चर्चासत्र.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मानवी अधिकार दिना निमित्त महिला व त्यांचे मानवाधिकार विषयावर वेंगुर्लेत चर्चासत्र.

प्रकाशन: 11 Dec 2024 08:55 AM
वाचन संख्या 62

प्रतिनिधी ( मळगांव) | नितिन गावडे : बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, महिला व बाल विकास विभाग सिंधुदुर्ग, महिला विकास कक्ष, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी अधिकार दिना निमित्य महिला व त्यांचे मानवाधिकार याविषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, चांगला समाज जर निर्माण व्हायचा असेल तर समाजाला अधिकारांची व कर्त्यव्याची जाणीव असणे गरजेची आहे, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कायद्याने दिलेल्या अधिकाराची जाणीव असावी असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री मिलिंद कांबळे, अधिकारी, महिला बालकल्याण विभाग सिंधुदुर्ग यांनी आपल्या भाषणात महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने निर्माण केलेल्या विविध कायद्याविषयी माहिती दिली. महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध कायदे, केंद्र शासन व राज्यशासनाच्या महिला व मुलींसाठी विकासाच्या विविध योजना, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेला कायदा तसेच महिला अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी निर्माण केलेल्या समुपदेशन केंद्र याविषयी मार्गदर्शन केले.

श्री अक्षय कानविंदे यांनी मानवी अधिकाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आवश्यक असून त्यातूनच एक जागृत समाज निर्माण होऊन समाज उन्नतीची उद्दिष्ट्ये सफल होऊ शकतात असे मत व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. मनीषा मुजुमदार यांनी प्रास्ताविकाच्या प्रास्ताविकात, महाविद्यालयात महिला सुरक्षितेसाठी व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. विवेक चव्हाण यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पांडुरंग गावडे, डॉ. कमलेश कांबळे, डॉ. जी. पी. धुरी, डॉ. सचिन परुळकर यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रा. लक्ष्मण नैताम, प्रा. जे. वाय. नाईक तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स