ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्टची सभा संपन्न.

श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्टची सभा संपन्न.

प्रकाशन: 08 Dec 2024 04:53 AM
वाचन संख्या 69

प्रतिनिधी : श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट पळसंबची सर्वसाधारण सभा ४ डिसेंबर रोजी संपन्न झाली. देवस्थान अध्यक्ष श्री रमेश परब यांच्या परवानगीने सभेची सुरुवात झाली. देवस्थानचे सचिव श्री योगेश कापडी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. तसेच मागील वर्षाचा जमाखर्च वाचून दाखवला.

दरम्यान देवडाळपस्वारी दिनांक २१, २२, २३डिसेंबर रोजी निश्चित झाली आहे. त्यासाठी दिनांक २० डिसेंबर सकाळी ९ वाजता सर्व मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या रितीरिवाजाप्रमाणे देव स्वारी श्री जयंतीदेवी मंदिरातून बाहेर पडून श्री देव आकारी ब्राह्मण याची भेट घेऊन श्री देव रवळनाथ आणि श्री देवी पावणाई आणि श्री देव गांगेश्वर यांची भेट घेऊन देव स्वारी दुपारी श्री रवळनाथ मंदिरामध्ये विसावणार आहे. दुपारी ३.३०मिनिटांनी देव स्वारी लोकांचे प्रश्न, पडस्थळ आणि शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यावेळी उपस्थित राहून भक्तगणांनी आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे आणि आपले प्रश्न सोडवून घ्यावेत अशी विनंती देवस्थानच्या वतीने करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी आठ वाजता देव स्वारी श्री रवळनाथ मंदिरातून बाहेर पडून श्री देव शेतशिवारा महापुरुष देव डिगीवाडी तसेच वाडीवरील भक्तगणांना दर्शन देऊन दुपारी डॉक्टर भोगटे यांच्या घरी महाप्रसादासाठी थांबणार आहे. त्यानंतर श्री देव नवगिरा, भूतोबा या स्थळांना भेटी देऊन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात येणार आहे. देव स्वारी वाटमार्गातील भक्तांना भेटी देऊन श्री देव सत्तावीस स्थळ या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर श्री देव आकारी ब्राम्हण मुळ पुरुष शेंबेकर या ठिकाणी भेट घेऊन खालचीवाडी येथे श्री पावणाई मंदिरात विश्रांती होणार आहे.

तिसऱ्या दिवशी खालचीवाडी येथून सकाळी ८ वाजता देव स्वारी मार्गस्थ होईल व आपकरवाडी महापुरूष देवस्थान येथे विश्रान्ती व तेथून गावठणवाडीतील मानकरी ग्रामस्थ यांच्या भेटी घेत रात्रीपर्यत ग्रामदेवता श्री. जयंतीदेवी मंदिरात विसावतील चौथ्या दिवशी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती देवस्थान मानकरी व देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी श्री. अण्णा कापडी यांनी देवस्थानाला २५० स्टीलची ताटे देण्याचे जाहीर केले. त्यांचे गावाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .

गावातील व बाहेरील भक्तगणांसाठी अभिषेक, एकादशमी यासाठी आठवड्यातील एक किंवा दोन वार निश्चित करून भटजीं मार्फत ही सेवा उपलब्ध करावी असे आवाहन ग्रामस्थ मंडळींनी केले.
यावेळी देवस्थान मानकरी देवस्थात ट्रस्टचे पदाधिकारी ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते. भक्तांना आर्थिक किंवा वस्तुरूप किंवा अन्नदानाची सेवा अर्पण करावयाची असल्यास देवस्थात ट्रस्टशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. अध्यक्ष रमेश परब यांनी उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स