ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वराडकर हायस्कूल कट्टा येथे गावठी बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद.

वराडकर हायस्कूल कट्टा येथे गावठी बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 08 Dec 2024 03:43 AM
वाचन संख्या 61

प्रतिनिधी : आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आठवडा गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, परिसरात मिळणाऱ्या विविध गावठी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. गावठी तांदूळ, नाचणी, कुळीथ पिठी, कोकम, चिंच, सुरण, गावठी पोहे ,आगळ ,खोबरेल तेल , वालीचे गर, गावठी अंडी, भुईमुगाच्या शेंगा, काजूगर, नारळ, आपल्या परिसरात मिळणाऱ्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ अशा विविध वस्तूंनी हा गावठी बाजार फुलला. या बाजारस भेट दिलेल्या ग्रामस्थ , पालकांनी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी आणलेल्या गावठी वस्तू खरेदी केल्या. त्याचबरोबर इयत्ता नववीच्या स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई उपक्रमांतर्गत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या स्टॉलवरही खवय्यांनी गर्दी केली.

श्री आनंद वालावलकर ,शाखा व्यवस्थापक लोकमान्य मल्टीपर्पज बँक, श्री शेखर पेणकर, सरपंच ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कट्टा, श्री सोमनाथ गायकवाड, सौ अंजली माहुरे जिल्हा स्काऊट गाईड संघटक, श्री सुनील नाईक, सचिव कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळ कट्टा, श्री सुधीर वराडकर शालेय समिती अध्यक्ष, श्री प्रकाश कदम माजी शिक्षक, श्री अनिल पाटील, उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, श्री अनिल फणसेकर माजी मुख्याध्यापक, सौ देवयानी गावडे मुख्याध्यापक वराडकर हायस्कूल कट्टा व शिक्षक वृंद, ग्रामस्थ ,पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गावठी बाजार संपन्न झाला . आभाळमाया ग्रुपचे सदस्य श्री मनीष ढोलम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन हजार रुपयाचे साहित्य खरेदी केले. व विद्यार्थ्यांना शितपेयाचे वाटप केले.

विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावे, प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार कसे करावेत , आपल्या परिसरात मिळणाऱ्या विविध वस्तूंचे बाजारपेठेतले महत्त्व लक्षात यावे या दृष्टीने या गावठी बाजाराचे आयोजन महत्त्वाचे ठरले. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागाबद्दल सर्वांचे कौतुक केले. या उपक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी केले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 283

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स