ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
धोंडी चिंदरकर यांनी पूर्ण खुलासा करावा : महेश राणे.

धोंडी चिंदरकर यांनी पूर्ण खुलासा करावा : महेश राणे.

प्रकाशन: 05 Dec 2024 04:46 PM
वाचन संख्या 158

ब्यूरो न्यूज : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांनी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिदरकर यांच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परीषदेतील काही वक्तव्यांबाबत त्यांचे म्हणणे स्पष्ट केले आहे. महेश राणे म्हणतात की, जर गेल्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून पराभूत उमेदवार वैभव नाईक यांना निवडणुक काळात कोणीतरी रसद पुरवली, त्यांची ताकद वाढवण्यात आली, निलेश राणे यांचा पॉलिटिकल एनकाउंटर करण्याचा प्रयत्न झाला अशी वक्तव्ये भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहेत. धोंडी चिंदरकर यांना या सगळ्या गोष्टी माहित असतील तर त्यांनी त्या व्यक्तींची नावे जाहीर करावीत. अर्धवट वक्तव्य करून जनतेत आणि महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असेआवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांनी केले आहे.

आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या व्हिजनचा होता. महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांनी एकसंघ केलेल्या कामाचा आहे. काही ठिकाणी मताधिक्य कमी झाले. त्याचा आढावा पक्षाच्या माध्यमातून घेतला जात आहे. विजयानंतर जल्लोष होत असताना नेते मंडळी यांना कार्यकर्ते विजयाचे श्रेय देत असतात. राणे कुटुंब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांना विजयाचे श्रेय आहेच. सोबतच महायुतीचे नेते मंडळी, कार्यकर्ते हे सर्व विजयाचे शिल्पकार आहेत. किंगमेकर आहेत. गेम चेंजर आहेत. अनेक उपाध्या दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे या निवडणुकीत कोणी कोणाला रसद पुरवली. विरोधकांना पैशाचे वाटप करून मते फिरवली. मताधिक्य घटवण्याचा प्रयत्न झाला. या मुद्द्यांचा चिंदरकर यांनी खुलासा करून ज्या उबाठा कार्यकर्ते यांना कोणी रसद पुरवली त्यांचीही नावे जाहीर करावीत. आमचे नेते आमदार निलेश राणे स्वतःच्या हिंमत्तीवर विजयी झाले. हा विजय महायुतीचा व जनतेचा आहे व राणे कुटुंबाच्या नेतृत्वाचा आहे. असे असताना धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. वैभव नाईक यांना रसद पुरवली गेली असे त्यांचे म्हणणे असेल तर त्याबाबत त्यांनी पूर्ण खुलासा करावा. असलेल्या पुराव्यासह नावे जाहीर करावीत. म्हणजे वरिष्ठ नेते त्यावर योग्य तो निर्णय घेतील. आगामी नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता धोंडी चिंदरकर यांची अर्धवट भुमिका महायुतीला अडचणीची ठरावी अशी असून अविश्वास निर्माण करणारी आहे. निवडणुकीत एकसंघ झालेल्या कामाला छेद देणारी त्यांची भुमिका असल्याचे महेश राणे यांनी म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स