एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्रीपद व आ. निलेश राणे यांना मंत्रीपद मिळावे.
मालवणातील महिला शिवसैनिकांचे श्री देव रामेश्वराला साकडे ; मालवण तालुका शिवसेना महिला आघाडीचा पुढाकार.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील सत्तास्थापना व मंत्रीमंडळ नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद तर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांना मंत्री पद मिळावे यासाठी, सोमवार दिनांक २ नोव्हेंबर शिवसेना मालवण तालुका महिला आघाडीच्या वतीने मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक अंजना सामंत, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुकाप्रमुख प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, शहर प्रमुख क्रांती धुरी, उपशहरप्रमुख योगिता साळुंखे, विभागप्रमुख निकिता तोडणकर, उपविभागप्रमुख रिया कुबल, प्रणिता रेवंडकर, श्रेया धुरी, रेश्मा गौडार, शाखाप्रमुख लुड्डीन फर्नांडीस, रुचिता हडकर, स्वप्नाली सावजी, सुनंदा आचरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)