बांदा ग्रामस्थांची माणगांव पदयात्रा उत्साहात.
बांदा | राकेश परब : प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थांची माणगाव पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. बांदा ते माणगाव असा पायी प्रवास करुन बांदा ग्रामस्थांनी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज संस्थापित श्री दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतले. या पदयात्रेत युवक ,महीला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.
सकाळी बांदा येथुन सुटलेले ग्रामस्थ दुपारी मंदिरातील आरतीच्या वेळी माणगावात पोहोचले. दर्शन व आरतीनंतर महाप्रसाद घेऊन सर्वजण बांदा येथे परतले. बांदा ते माणगाव या पहिल्या पदयात्रेने बांदावासीयांच्या विविध पदयात्रांना आरंभ झाला असून पुढील पदयात्रांच्या तारखा त्या त्या वेळी घोषित करण्यात येतील असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळ अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी कळविले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.