ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ओल्ड गोवा येथे फेस्त उत्सवात जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान पदयात्रेने गोव्यात.

ओल्ड गोवा येथे फेस्त उत्सवात जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान पदयात्रेने गोव्यात.

प्रकाशन: 01 Dec 2024 11:29 PM
वाचन संख्या 112

मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे, सातार्डा, ओल्ड गोवा अशी पदयात्रा.

यात्रेकरुंनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे मानले आभार.

सावंतवाडी | प्रतिनिधी : ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहा वर्षाप्रमाणे यंदाही भल्या पहाटे गोवा गाठले. या पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. तसेच या पदयात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ‘राष्ट्र प्रथम’ हे अभियान राबवताना त्याचे महत्त्व स्पष्ट करून याबाबतच्या पत्रकांचे यात्रेकरूंना वितरण केले.

ओल्ड गोवा येथील दरवर्षी ३ डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त उत्सवासाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव भाविक चार दिवसांची पदयात्रा करीत सहभागी होत असतात. ही पदयात्रा मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे सातार्डाला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २०१३ पासून गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंच्या चहा पाणी, नाश्त्याची व्यवस्था करून त्यांचे विविध विषयावर प्रबोधन केले जाते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पदयात्रेकरूंच्या वतीने इलियास फर्नाडिस, फादर थॉमस फर्नांडिस, बेनी डिसोजा, जोसेफ पॉल यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी ‘प्रथम राष्ट्र’ या जनजागरण अभियानाबाबत मार्गदर्शन करताना राष्ट्र प्रथम का असले पाहिजे आणि देशसेवा का करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ विशाल पाटील, भार्गवराम शिरोडकर, भगवान रेडकर, आनंद मेस्त्री, संतोष नाईक विनय वाडकर, दीपक गावकर, नितीन गोंडगिरे, सिद्धेश मणेरीकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स