ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्ग पायाभरणी दिन सोहळा.

श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्ग पायाभरणी दिन सोहळा.

प्रकाशन: 25 Nov 2024 03:37 PM
वाचन संख्या 215

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा पाषाणावरील श्री गणेशाची पूजा करुन गार्‍हाणे घालण्यात आले. यावेळी प्रा डाॅ आर एन काटकर, रविकिरण तोरसकर, दत्ता नेरकर, गुरुनाथ राणे, रत्नाकर कोळंबकर, मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, हरीष उर्फ दादा वेंगुर्लेकर, रविकिरण आपटे, प्रदिप वेंगुर्लेकर, किर्तनकार रामगिरी बुवा, डाॅ मंजूश्री काटकर, राज्य मुख्याध्यापक संघाचे सल्लागार श्री चिंतामणी तोरसकर उपस्थित होते.

हा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या वतीने साजरा करण्यात येतो. या निमित्त संपन्न होणार्या पूजेला शासकीय दर्जा प्राप्त आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स