ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सुकळवाड पाताडेवाडी येथे निलेश राणेंच्या विजयाचा  ढोल ताशांच्या गजरात जल्लोष.

सुकळवाड पाताडेवाडी येथे निलेश राणेंच्या विजयाचा ढोल ताशांच्या गजरात जल्लोष.

प्रकाशन: 24 Nov 2024 08:21 PM
वाचन संख्या 54

प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी भवानी मंदिर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयानंतर पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ढोल ताशांच गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करत विजय साजरा केला.

निलेश राणे तसेच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी सुद्धा भवानी मंदिर साठी सहकार्य केले असून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ सुमेधा पाताडे, माजी सभापती श्री अजिंक्य पाताडे, उत्कर्ष मंडळ अध्यक्ष संजय पाताडे, ग्रा.प.सदस्या सौ प्रमिला पाताडे, ग्रा.प.सदस्य नरेंद्र पाताडे, उत्तम पाताडे, विजय पाताडे,सौ वैशाली पाताडे, सौ सुहासिनी पाताडे,भवानी देवी मानकरी श्री शांताराम पाताडे, ललित पाताडे, भूषण रमाकांत पाताडे, शिवराम पाताडे, नितीन पाताडे, किरण पाताडे, सुयोग पाताडे, प्रसाद पाताडे, भूषण गणपत पाताडे, मंगेश पाताडे, अनिकेत पाताडे, आनंद पाताडे, आदेश पाताडे,तुळशीदास पाताडे, ओंकार पाताडे, मनोहर पाताडे,सागर पाताडे,अनिल काळसेकर, पंढरी पाताडे, दत्ताराम कसवणकर, गजानन पाताडे, पुरुषोत्तम पाताडे, निखिल काळसेकर, पियुष काळसेकर, मिथिलेश पाताडे, मधुराज पाताडे, श्रेयश पाताडे,कौस्तुभ पाताडे,पंकज पाताडे, घनश्याम पाताडे, कार्तिक पाताडे, राजेश पाताडे, चन्द्रेश पाताडे आदी उपस्थित होते

यावेळी पाताडेवाडी बूथ वर निलेश राणे यांना समाधानकारक मताधिक्य मिळाल्याचा आनंद समस्त पदाधिकारी यांनी व्यक्त करून राणे कुटुंबाने कधीच मंदिर अथवा सार्वजनिक कामे याविषयी स्वार्थी राजकारण न करता काम केल्याने जनतेने भरभरून मतदान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स