ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी गृह मतदानाद्वारे बजावला मतदानाचा हक्क.
ब्यूरो न्यूज : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी गृह मतदानाद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा हक्क बजावला आहे या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी भारत निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना राबवित आहे. याचाच भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना गृह मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या अंतर्गत आज २६८- कणकवली विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी करुळ येथील आपल्या निवासस्थानी गृह मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस ते म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मी आज मतदान करुन माझे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. तसेच इतर मतदारांनी सुध्दा आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)