ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
…तर तुमची साथ सोडायची वेळ स्वयंभू सरपंच आणि सुशिक्षित व बेरोजगार कार्यकर्ते यांच्यावर आली नसती.

…तर तुमची साथ सोडायची वेळ स्वयंभू सरपंच आणि सुशिक्षित व बेरोजगार कार्यकर्ते यांच्यावर आली नसती.

प्रकाशन: 13 Nov 2024 11:15 AM
वाचन संख्या 312

आमदार वैभव नाईक यांनी ११ नोव्हेंबर रोजी प्रवेश करून घेतलेले बांदिवडे गावातील ओंकार मुरकर शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेना आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांची प्रतिक्रिया.

ब्यूरो न्यूज : ११ नोव्हेंबर रोजी आमदार तथा बांदिवडे सरपंच मालवण युवा उपतालुका प्रमुख श्री. आशु मयेकर यांनी काल पुन्हा श्री.वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला आहे. वैभव नाईक यांनी ११ नोव्हेंबर रोजी प्रवेश करून घेतलेले बांदिवडे गावातील ओंकार मुरकर शिवसेनेत दाखल झाले आहेत. या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले आहे की स्वयंभू सरपंच व कार्यकर्त्यांना तुम्ही आपले म्हटलात व त्यांच्या कडून काम करून मताधिक्य घेतलात. परंतु त्याच हिऱ्याच्या रुपातील कार्यकर्त्यांना उद्योग, लघुउद्योगाच्या रूपाने पैलु पाडला असता तर आज तुमची साथ सोडण्याची वेळ सुशिक्षित व बेरोजगार कार्यकत्यावर आली नसती. अंतिम विजय जवळ आलाय. कार्यकर्ते, मतदार तुमच्या सोबत राहायला तयार नाहीत. तुम्ही कित्येक वर्षे राणे परिवारावर टीका करून, दहशतवाद आहे म्हणून जनमानसात पसरवून स्वतःची पोळी भाजून घेण्यात धन्यता मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून मते मिळवण्याची धडपड बंद करा. विजय हा सत्याचा होणार असून आमदार म्हणून सन्मानीय डॉ. निलेश राणे विधानसभेत पोहाचतील यात कोणतीही शंका नाही असा विश्वास शिवसेना विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी प्रफुल्ल प्रभू शाखा प्रमुख, बाळू माळकर, मोहन प्रभू लीला मुणगेकर, विकास आचरेकर , संतोष सावंत, विठोबा गुरव, मयुरेश राणे लखन बांदिवडेकर, अजय घाडी, केशव परब, पांडुरंग मुणगेकर, विठ्ठल मूरकर, श्रीधर हडकर, बबन मांजरेकर, सतिश आईर, शशांक परब, राजेश घाडीगावकर, करण घाडीगांवकर, शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स