ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा - हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा - हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल.

प्रकाशन: 12 Nov 2024 12:29 PM
वाचन संख्या 69

आमदार वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया.

आचरा | ब्यूरो न्यूज : कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा – हिर्लेवाडी गावामधील युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे. आचरा गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आ. वैभव नाईक यांनी अनेक विकासात्मक व समाजोपयोगी कामे केली आहेत. आ. वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आ. वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारले असून ते सर्वसामान्यांमध्ये वावरून सर्वसामान्यांच्या वेळे प्रसंगाला धावून जाणारे आमदार आहेत यामुळेच आपण त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना पक्षाची मशाल हाती घेतली आहे येणाऱ्या काळात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आपण जोमाने काम करू असेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास येथील युवकांनी दाखवला त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत आचरा गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला आहे.

यावेळी दर्पण आचरेकर, धनंजय आचरेकर, मंथन मुणगेकर, अनिकेत पेडणेकर, राजा वायंगणकर, मंदार केरकर, दर्शन मुणगेकर व इतर प्रमुख युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना आचरा विभाग समन्वयक मंगेश टेमकर,उपविभाग समन्वयक पप्पू परुळेकर, आचरा शहरप्रमुख छोटू पांगे, युवासेना शाखा संघटक रूपम टेमकर आदी शिवसैनिक उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स