जयप्रकाश परुळेकर यांची शिवसेना आचरा पंचायत समिती प्रमुख पदी नियुक्ती.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या आचरा पंचायत समिती प्रमुख पदी जयप्रकाश कृष्णाजी परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते जयप्रकाश परुळेकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, महेश मांजरेकर, आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, युवा जिल्हा संपर्क प्रमुख मंदार लुडबे , सोशल मिडिया प्रमुख मनोज हडकर, बापू परुळेकर, बाबू कदम, उप तालुकाप्रमुख व बांदिवडे सरपंच आशुतोष मयेकर, उप विभाग प्रमुख संतोष सावंत, अरुण घाडी, चिंदर युवा संघटक अमोल माळगांवकर, उद्योजक अभय भोसले, पंकज आचरेकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)