ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
गोळवण मध्ये श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गोळवण मध्ये श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

प्रकाशन: 06 Nov 2024 04:43 PM
वाचन संख्या 337

“बा..! देवा महाराजा,
वैभवचो सांभाळ करुन तेंका मोठ्या मताधिक्य्यान निवडून हान रे महाराजाsss… !!”

मालवण | प्रतिनिधी : तालुक्यातील गोळण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी ९.३० वा गोळवणचे ग्रामदैवत मंदीर श्री. देव रवळनाथ मंदिरात गोळवण शिवसैनिकांच्या उपस्थित नारळ वाढवून झाला. श्री देव रवळनाथ च्या चरणी ‘बा!! देवा महाराजा,वैभवचो सांभाळ करुन तेंका मोठ्या मताधिक्य्यान निवडून हान रे महाराजाsss…!!असं साकड घालून करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी “वैभव नाईक आगे बढो,हम तुम्हारे साथ है”, “निष्ठेचे पाईक वैभव नाईक” अशा जोरदार घोषणा देत प्रचाराचा शुभारंभ केला.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार आमदार वैभव नाईक यांना विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असा समस्त शिवसैनिकांनी निर्धार केला आहे.

यावेळी उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण,माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, रामु परब, मानकरी अरुण घाडी, मुरारी गावडे, दिगंबर सावंत,अक्षय दाभोळकर, एकनाथ चव्हाण, हेमंत परब, आजा सावंत, गुरुनाथ पालव, वसंत परब, संदीप नाईक, आदीओम लाड, मंगला चिरमुले, पुष्पा चिरमुले, आजोबा सावंत, तुळाजी घाडीगावकर, आप्पा चिरमुले, विठोबा दाभोळकर,शेखर घाडी, राजेंद्र गावडे, हरिश्चंद्र गावडे, महादेव पवार, नामदेव गावडे, चिरमुले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स