ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुंबई सिंधुदुर्ग विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात यावी.

मुंबई सिंधुदुर्ग विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात यावी.

प्रकाशन: 06 Nov 2024 01:21 PM
वाचन संख्या 82

माजी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केला होता. पर्यटन जिल्हा म्हणून जिल्ह्यामध्ये विमानतळ कार्यान्वित केले होते. मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी विमान वाहतूक सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे .यामुळे दिवाळीच्या सुटी मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पर्यटनाच्या व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. याला अनुसरून सुरेश प्रभू (माजी विमान वाहतूक मंत्री) यांनी किंजरापू राममोहन नायडू (केंद्रीय केबिनेट विमान वाहतूक मंत्री) यांच्याशी चर्चा करून ती सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी यासाठी विनंती केली आहे. आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणुकीनंतर महाराष्ट्र शासनाशी बोलून समन्वय घडवून आवश्यक ती सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. विमान सेवा सुरळीत करण्यासाठी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश व त्याची माहिती घेण्यास घेतली असून त्या संदर्भात कारवाई सुरू आहे असे केंद्रीय मंत्री किंजरापू राजमोहन नायडू यांनी फोनवर सुरेश प्रभू यांना दिली.

उडान या स्कीम मध्ये हा विमानतळ असल्यामुळे याच्या सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे असे सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशा अंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असून, सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला असल्याने या ठिकाणी विमान वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यकच आहे. यामुळे देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास मोठे सहाय्य होणार आहे . मुंबई सिंधुदुर्ग ही विमान वाहतूक सेवा आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक असून मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबईवरून या ठिकाणी येत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे .त्याचबरोबर रत्नागिरी मध्ये होत असलेल्या विमानतळा बाबत पण चर्चा करून या संबंधात आवश्यक असणारा समन्वयक साधण्याची सूचना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स