ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांचे पत्रकार परीषदेत विरोधकांना आव्हान.

आमदार वैभव नाईक यांचे पत्रकार परीषदेत विरोधकांना आव्हान.

प्रकाशन: 06 Nov 2024 02:34 AM
वाचन संख्या 80

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व विधानसभा निवडणूक २०२४ चे मविआ उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी मालवण मधील पत्रकार परीषदेत विरोधकांवर टीका करत त्यांना आव्हान दिले. वैभव नाईक म्हणाले की गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी भेटल्याचे खासदार नारायण राणे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन.

मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर व सन्मेष उर्फ राजू परब, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, माजी नगरसेवक महेश जावकर, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, तपस्वी मयेकर, सुहास वालावलकर, महेश जावकर, किशोर गावकर, नीनाक्षी शिंदे, अक्षय रेवंडकर, नंदा सारंग, नरेश हुले, अन्वय प्रभू, राका रोगे, हेमंत मोंडकर, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, उमेश चव्हाण, गणपत आडीवरेकर, मनोज मोंडकर, स्वप्नील आचरेकर, तेजस लुडबे, बाबू वाघ, प्रविण रेवंडकर, भाग्यश्री लाकडे, किस्तू फर्नांडिस, गणेश कुडाळकर आदी उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक होत आहे, परंतु मी अडीच वर्षे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत निष्ठावंत म्हणून राहिलोय. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जी विकास कामे मंजूर होती, त्या विकास कामांना शिंदे सरकारने स्टे लावला होता. या सरकारने स्टे उठवावा, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन तीन वेळा मी भेटलो पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी त्यात राजकारण करून स्टे उठवला नाही. परंतु अलीकडच्या काळात राणे यांचे सुपुत्र ज्या विकासकामांची उदघाटने करतायत आणि भाजपचे काही पदाधिकारी त्या कामांचे श्रेय घेत होते, ती विकासकामे असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंजूर करून घेतली होती. त्या कामांचा स्टे शिंदे सरकारने न उठवता, सर्वोच्च न्यायालयातून आम्ही उठवीला, त्याची ऑर्डरही आमच्याकडे आहे. आता निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री जेव्हा सिंधुदुर्गात येतील तेव्हा आमचे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे कि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैभव नाईक मला गेल्या दोन वर्षात भेटले असे जे नारायण राणे सांगत आहेत, त्याविषयी भूमिका स्पष्ट करावी असे आव्हानही नाईक यांनी दिले. कोण कोणत्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले हे मी सिद्ध करेन. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राणे हे काँग्रेस मध्ये होते. त्यांनी आपल्यावरील इडीची कारवाई टळावी यासाठी त्यावेळी गुजरातमध्ये अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना राणे भेटले होते याचे व्हिडीओही त्यावेळी व्हायरल झाले होते.

माझ्या कार्यशैलीने प्रेरीत होऊन अनेक राणे समर्थक, भाजप कार्यकर्ते, शिंदे शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आज ठाकरे सेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे सेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो, हाच सर्वसामान्य कार्यकर्ता या निवडणुकीत माझ्या विजयासाठी मेहनत घेत आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, अशा शब्दात वैभव नाईक यांनी राणेंच्या टीकेला उत्तर दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स