ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आंबा बागांचे पुनरुज्जीवन फायद्याचे असल्याचे डॉ. मिथिलेश सणस यांचे प्रतिपादन..

आंबा बागांचे पुनरुज्जीवन फायद्याचे असल्याचे डॉ. मिथिलेश सणस यांचे प्रतिपादन..

प्रकाशन: 24 Oct 2021 11:55 AM
वाचन संख्या 81

आनंदव्हाळ येथे आंबा पुनरुज्जीवन प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर : जुन्या आंब्याच्या झाडांपासून कमी उत्पादन मिळते. ज्या बागांमधली झाडं खूप उंच वाढली आहेत, ज्या बागांमध्ये फवारणी, फळांची काढणी इत्यादी कामे निटपणे करणे अवघड झालं आहे तसेच, शाखीय वाढ अत्यंत घट्ट झाल्यामुळे सूर्यप्रकाश झाडातील आतील भागापर्यंत पोहोचत नाही. अशा बागेतील झाडांचे टप्प्या-टप्प्याने पुनरुज्जीवन करणे फायद्याचे असल्याचे मत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. मिथिलेश सणस यांनी व्यक्त केले. आनंदव्हाळ गोवेकरवाडी येथील शैलेश गोवेकर यांच्या बागेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य आधरित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत आंबा पुनरुज्जीवन प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंदव्हाळ उपसरपंच शैलेश भोसले, कातवड उपसरपंच गणेश चव्हाण, शेतकरी सल्ला समिती सदस्या भाग्यश्री चव्हाण, कृषि पर्यवेक्षक सिताराम परब, कृषि सहाय्यक धनंजय गावडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक मालवण निलेश गोसावी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ चव्हाण, श्रीनाथ निकम, विजय ढोलम, प्रभाकर सावंत, सुजय घाडी आदींनी सहकार्य केले. यावेळी कातवड, आनंदव्हाळ, कुंभारमाठ, देवली, वाघवणे, नांदरुख येथील शेतक-यांनी प्रशिक्षणास उपस्थिती दर्शवली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स