मालवण बाजारपेठेतील एग्रो दुकानाला भीषण आग…!
फायरबाॅल्सनाही थोपली नाही आग..!
स्वतः मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची घटनास्थळी मदत…!
बाजारपेठेतील व्यापार्यांची एकजुटीने मदत ; जुनी अग्निशमन गाडी व्यापार्यांकडे दुरुस्तीसाठी द्यायची मागणी…!
मालवण | ब्युरो न्यूज : मालवण सोमवारपेठेतील तथा मुख्य बाजारपेठेतल्या मारुती मंदिर समोरील विलास एग्रो या विलास हरमलकर यांच्या दुकानाला आग लागली आज रविवारी पहाटे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने लाखोंची हानी झाली असून आगीचे नेमके कारण लगेचच समजू शकले नव्हते. मालवणच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी आग विझवण्यासाठी जीव धोक्यात घालून जीव धोक्यात घालून तिथे मदत केली. नगरपालिका कर्मचारी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत करण्याचा प्रयत्न केल्या आग विजवण्यासाठी पालिकेकडे असलेल्या फायर बॉल पैकी सात ते आठ फायर बॉल आगीत टाकण्यात आले परंतु आगीचा भडका मोठा असल्यामुळे आग नियंत्रणात येत नव्हती. वीज कर्मचाऱ्यांना बोलवून काही काळ शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुरुमाऊली या दुकानात माल लावण्याचे काम
करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुकानातून आधीचे लोट येत असल्याचे दिसून आले त्यावेळी त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली.
गाडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे फोर्स पाईप आणून एकता मित्रमंडळाच्या अमेय देसाई यांनी अन्य व्यापारी बांधवांसह लगतच्या दुकानांच्या छपरावर चढून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला .यातच आग विझवत असताना रणजीत पारकर हे छपरावरून कोसळले. नगराध्यक्षांच्या ही अंगावर विटा कोसळल्या एकूणच व्यापाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदत केली.
त्यातच नगरपालिकेचे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने सर्व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दिवाळी काळात जिल्ह्यातून एखादी अग्निशमन गाडी मालवण शहरात आणून ठेवणे गरजेचे आहे अशी मागणी आता जोर धरत आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत व्यवस्था करावी त्या दिवसाचे भाडे भरू अशी भूमिका उमेश नेरुरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर ,रणजीत पारकर या व्यापारी बांधवांनी सांगितले अथवा नवीन अग्निशमन येईपर्यंत जुनी अग्निशमन गाडी द्या आम्ही ते दुरुस्त करतो असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)