ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडी येथील सभेत चर्मकार समाज भवनाच्या स्वप्नासाठी एकजूट दाखवायचे ऍड.अनिल निरवडेकर यांचे आवाहन...!

सावंतवाडी येथील सभेत चर्मकार समाज भवनाच्या स्वप्नासाठी एकजूट दाखवायचे ऍड.अनिल निरवडेकर यांचे आवाहन...!

प्रकाशन: 24 Oct 2021 11:17 AM
वाचन संख्या 36

जिल्हाध्यक्ष श्री सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस श्री.चंद्रसेन पाताडे यांची केली विशेष प्रशंसा……!

पोईप | ओंकार चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित सावंतवाडी तालुका शाखेच्या सभेत जिल्हा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक ऍड.अनिल निरवडेकर यांनी उपस्थित समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की,आपल्या समाज भवनाचे स्वप्न आता साकार होत आहे.यासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे व समस्त कार्यकारिणी कौतुकास पात्र आहे.31 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहूया आणि या भवनासाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे.माजी तालुकाध्यक्ष ओमप्रकाश तिवरेकर यांनीही समाजभवनाच्या स्वप्नपूर्तीबद्दल विद्यमान कार्यकारिणी व जागा घेण्यासाठी प्रयत्न केलेल्या ऍड.निरवडेकर यांचे अभिनंदन केले.माजी जिल्हा सरचिटणीस पी.बी.चव्हाण यांनी संत रविदास एका समाजाचे नसून सर्व समाजाचे आहेत आणि याच भावनेने सर्व समाज यासाठी सहकार्य करतील अशी आशा व्यक्त केली.तालुकाध्यक्ष दिलीप इन्सुलकर यांनी सर्व समाजबांधवांनी आपला घरचा कार्यक्रम समजून आपली उपस्थिती लावावी आणि भवनाचे कार्यास हातभार लावावा असे आवाहन केले.
सदर सभेस जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण,तालुका सचिव जगदीश चव्हाण,माजी तालुका सचिव भारत बांदेकर,नरेश कारीवडेकर, बांबूळकर,चव्हाण आदी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव जगदीश चव्हाण यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स