ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडी मतदारसंघातील आजी - माजी महाराष्ट्र सैनिकांची मते वरीष्ठ नेत्यांपर्यत पोहचवणार.

सावंतवाडी मतदारसंघातील आजी - माजी महाराष्ट्र सैनिकांची मते वरीष्ठ नेत्यांपर्यत पोहचवणार.

प्रकाशन: 02 Nov 2024 09:13 PM
वाचन संख्या 33

मनसे परीवहन सेना जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर यांची माहिती.

मळगांव | प्रतिनिधी : सावंतवाडी मतदारसंघातील मनसेच्या सर्व कार्येकर्तांना भेटून त्यांची मते जाणून घेतली जातील व महाराष्ट्र सैनिकांची भावना मनसेच्या वरीष्ठ नेते यांच्यापर्यंत पोहचवण्यात येतील, या मतदारसंघात मनसे पक्षाचा उमेदवार उभा नसला तरीही महाराष्ट्र सैनिकांनी निराश न होता यापुढेही पक्षाचे काम अविरतपणे पुढे सुरू ठेवावे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण परीवहन सेना तथा सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर यांनी व्यक्त केले.

हिंदूत्व हाच आमचा श्वास आहे, मनसे हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा पक्ष असुन या पक्षाकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावित असुन त्यांना संघटितपणे योग्य दिशा देण्याचे काम आपण करत करत असून लवकरचं आपण स्वतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात फिरुन सर्व आजी माजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहे, मनसे पक्ष सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात संघात जनतेच्या प्रश्नांवर कायम लढत राहीला आहे, अनेक आंदोलने, लोकोपयोगी उपक्रम राबवून येथील जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे येथील जनतेची पक्षाविषयी एक चांगली प्रतिमा मनात निर्माण झाली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मनसेला मानणारा एक मोठा वर्ग असल्याचे त्यांनी म्हटले, तसेचं या घटकांनी विचलीत न होता मनसेला यापुढेही साथ द्यावी, या निवडणुकीत उमेदवार नसला तरी पक्ष संघटना अजून जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न करावे व भविष्यात सावंतवाडी मतदारसंघात मनसेमय करावी, कोणतेही प्रश्न असले तरी निवडणुकीकांचा विचार न करता मनसेचा कार्य सुरुचं राहणार असल्याचे ॲड. कासकर म्हणाले.

लवकरच मनसे पक्षाची गावागावात बैठक घेण्यात येणार त्यावेळी महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करुन त्यांची मते जाणून घेऊन ती मते आम्ही आमच्या वरीष्ठ नेत्यांपर्यत कळविण्यात येणार असे ॲड. राजू कासकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स