महेश कांदळगांवकर यांची शिवसेना जिल्हा संघटक पदी नियुक्ती.
मालवण | प्रतिनिधी : मालवणचे माजी नगराध्यक्ष व महेश कांदळगावकर यांची शिवसेना जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. महेश कांदळगांवकर यांच्याकडे कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी या पाच तालुक्यांची जबबादारी देण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे, उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री. कांदळगावकर यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.यावेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, नीलम शिंदे आदी उपस्थित होते.
३० ऑक्टोबर रोजी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मालवण मेळाव्यात महेश कांदळगांवकर यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत सत्कार देखिल संपन्न झाला. नगराध्यक्ष म्हणून आपण निभावलेल्या कामगिरीचा विचार करुन आपली ही नियुक्ती झाली व सर्वांना सोबत घेऊन ही जबाबदारी सांभाळणार असे महेश कांदळगांवकर यांनी सांगितले. या नियुक्ती बद्दल निलेश राणे तसेच पक्ष निरीक्षक दीपक वेतकर, बाळा चिंदरकर , उपनेते रवीद्र आंग्रे , जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.
नियुक्ती पत्र
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
महेश कांदळगांवकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन.
महेश कांदळगांवकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटर तसेच एक अभ्यासू व संयमी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. युवा अवस्थेत महाविद्यालयाचा जिएस त्यानंतर नगरपरिषद कर्मचारी व नंतर मालवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष अशी वाटचाल करणार्या महेश कांदळगांवकर यांची शिवसेना संघटक म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)