ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कट्टा येथे आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कट्टा येथे आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 01 Nov 2024 01:03 PM
वाचन संख्या 102

बॅ नाथ पै वाचन मंदिर यांचे आयोजन.

मसुरे | झुंजार पेडणेकर : बॅ नाथ पै वाचन मंदिर कट्टाच्या वतीने
प्रा मधु दंडवते स्मृतिदिना निमित्त आयोजित आकाश कंदिल व भेटकार्ड बनवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १ ली ते ४ थी गटात ८३, ५ वी ते ७ वी गटात ६ ५, ८ वी ते १० वी गटात ३५ व खुल्या गटात १२ स्पर्धकानी अशा एकूण १९५ स्पर्धकानी या स्पर्धेत सहभाग घेतला. कागद, कार्डशीट, झावळी याचा वापर करून मुलानी विविध प्रकारचे कंदील व दिवाळी भेटकार्ड बनविले. या सर्व कंदिलाचे व भेटकार्डचे प्रदर्शन बॅ नाथ पै सेवांगण येथे मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री बाळकृष्ण नांदोसकर,
सौ नांदोसकर, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, मोहन तांबट, दीपक भोगटे, सौ. जांभवडेकर, श्रीधर गोंधळी व यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रा मधु दंडवते स्मृतिदिनी
१६ नोहेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केला आहे.
त्याला उपास्थित राहाण्याचे आवाहन वाचन मंदिच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स