अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य अध्यक्षपदी देविदास बस्वदे तर सरचिटणीसपदी कल्याण लवांडे यांची फेर निवड.
सिंधुदुर्ग मधून महादेव देसाई राज्य उपाध्यक्षपदी, श्रीम. विनयश्री पेडणेकर कोषाध्यक्षपदी, प्रशांत पारकर यांची राज्य संयुक्त सचिवपदी तर गुरुदास कुबल व राजाराम कविटकर यांची संघटक पदी निवड.
मसुरे | प्रतिनिधी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन व शिक्षक नायक स्वर्गीय अरुण भाई दोंदे व सुलभाताई यांचा स्मृतिदिन समारंभ कार्यक्रम महावीर भवन हिंगोली येथे संपन्न झाला. शिक्षक नायक स्व. अरुण दोंदे व स्व. सुलभाताई दोंदे यांच्या स्मृतीस राज्यभरातून आलेल्या संघटना पदाधिकाऱी यांनी अभिवादन केले . विषय नियमक समितीच्या ठरावानुसार माजी राज्याध्यक्ष प्रकाश भाई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार सुरेश भावसार व विश्वनाथ सूर्यवंशी यांची त्रिसदस्यीय निवड समितीने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची पुढील तीन वर्षासाठी राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी राज्य अध्यक्ष पदी – देविदास बसवदे, राज्य सरचिटणीस – कल्याण लवांडे ,
कार्याध्यक्ष- अण्णाजी आडे, कोषाध्यक्ष – विनयश्री पेडणेकर यांची फेरनिवड करण्यात आली.
उर्वरित राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे – महिला विभाग प्रमुख -उर्मिला बोंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष – किरण पाटील, कोकण विभागीय अध्यक्ष.प्रमोद पाटील, पुणे विभाग – दीपक भुजबळ ,नाशिक विभाग- भगवान पाटील, अमरावती विभाग- दिगंबर जगताप, मराठवाडा विभाग – सुनील हाके ,नागपूर विभाग केशव बुरडे, उपाध्यक्ष- म. ल. देसाई, व्हि. डी .देशमुख, अनिल महाजन, हरिदास घोगरे, विजय मनवर, लालासाहेब मगर, शिवानंद सहारकर , परमेश्वर बालकुंदे कार्यालयीन चिटणीस – महेश देशमुख, उपसरचिटणीस- सौ. संध्या ठाकरे, संयुक्त सचिव – रवींद्र काकडे, कृष्णा चिकणे, विलास आळे, प्रशांत पारकर, सौ. मायाताई चाफले, राजेंद्र निमसे, कु. संगीता पागृत, डी. एस. कोल्हे, दिलीप देवकांबळे , शुभांगी कचरे, राज्य संघटक – राजा कविटकर, सौ. पद्मशाली डी एम शांताराम पाटील , बाळासाहेब कदम, कांचन कडू ,सविता पिसे, गुरुदास कुबल, सौ.आशाताई झिलपे, जयवंत काळे, ज्योती कुर्डुणकर, विजय पंडित,किशोर चौधरी, संतोष लोहार, हिशोब तपासणीस – लोकेश गायकवाड, फारुक बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)