समाजासाठी संघर्ष करण्यास आपण कटीबद्ध : ऑल इंडिया धनगर समाजाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ झोरे.
तालुक्यातील धनगर समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी येणाऱ्या चार दिवसात समाजाच्या वाडीवस्तीवर जाणार .
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील धनगर समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण येणाऱ्या चार दिवसात समाजाच्या वाडीवस्तीवर जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया धनगर समाजाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रशासनाने धनगर समाजाला गृहीत धरून चालल्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे त्यामुळे समाजाच्या न्याय व हक्कासाठी आता माघार घेतली जाणार नाही तर वेळ पडल्यास समाजाला संघर्ष ही करण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून येणाऱ्या काळात समाजाला न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढे सुरूच राहतील अशीही ग्वाही ऑल इंडिया धनगर समाजाचे माजी अध्यक्ष नवनाथ झोरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)