ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
स्टॅम्पचे वाढीव दर हा सर्वसामान्यांना अब्जावधींचा भुर्दंड ; श्रीकांत सावंत यांचा संताप.

स्टॅम्पचे वाढीव दर हा सर्वसामान्यांना अब्जावधींचा भुर्दंड ; श्रीकांत सावंत यांचा संताप.

प्रकाशन: 25 Oct 2024 03:00 PM
वाचन संख्या 173

मुंबई | ब्यूरो न्यूज : मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट नुसार १४ ऑक्टोबर पासून जे नविन वाढीव शुल्क आकारण्यात येत आहे त्यावर टीका केली आहे. शासन एकिकडे काही योजना राबवत आहे हे चांगलेच आहे पण दुसरीकडे पूर्वीच्या स्टॅम्पच्या दराच्या चौपट शुल्क आकारत आहे त्यामुळे सामान्य नागरीक, विद्यार्थी तसेच जनतेला कोट्यावधींचा भुर्दंड सोसावा लागत असल्याची टीका श्रीकांत सावंत यांनी केली आहे.

सध्या आचारसंहीता असल्याने राज्य सरकार आता हे दर कमी करु शकत नसेल तर माननीय न्यायालयाने यात हस्तक्षेप करुन तोडगा काढावा व सर्वसामान्यांना होणारा त्रास थांबवावा अशी विनंती श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे केली आहे.

श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे की, हे नवीन दर त्वरीत मागे घेण्यात यावेत. या वाढीचा त्रास विद्यार्थी, शेतकरी व सामान्य जनतेलाच होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तसेच राज्यातील विद्यमान आमदार, खासदारांनी याला विरोध केलाच पाहिजे. सर्वसामान्यांच्या खिशातून अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा जाऊ लागला तर दैनंदिन जीवन कसे चालणार असाही सवाल श्रीकांत सावंत यांनी केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स