ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
परतीच्या पावसाने केले भातशेतीचे अतोनात नुकसान.

परतीच्या पावसाने केले भातशेतीचे अतोनात नुकसान.

प्रकाशन: 25 Oct 2024 03:57 PM
वाचन संख्या 75

तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची मागणी.

मळगांव | नितिन गावडे : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायत उपसरपंचांनी अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर कोसळत असलेल्या समस्यांबाबत लक्ष वेधले आहे. आठवडाभरापासून दुपारनंतर कोसळत असलेल्या पावसामुळे न्हावेलीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. त्यामुळे आभाळ फाटलं अन शेतकऱ्याच्या डोळ्यात दाटलं असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे न्हावेलीतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेतात येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचा ना पंचनामा, ना पहाणी झाली. न्हावेलीत चार वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी केलेली भात कापणी पाण्यात तरंगू लागली तर अनेक ठिकाणी उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्याचे सर्व कष्ट वाया गेले. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाचे पंचनामा करावेत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी न्हावेली गावचे उपसरपंच श्री. अक्षय पार्सेकर यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स