वीज कोसळून माडाला उभी भेग..!
बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील येथे मंगळवारी सायंकाळी उशिरा प्रचंड विजांच्या कडकडाटासह मडूरा पंचक्रोशीत मुसळधार पाऊस झाला. मडुरा रेडकरवाडी येथील शेतकरी रुपेश मडूरकर यांच्या माडावर वीज कोसळून संपूर्ण माडाला उभी भेग गेली आहे. तसेच लगतच्या विहिरीचा मोटर पंपाचे नुकसान झाले. त्यांच्या घरातील वायरिंगचेही काही प्रमाणात नुकसान झाले. तसेच अन्य तीन माडाची झाडेही वीजेमुळे प्रभावित झाली आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)