फोवकांडा पिंपळ ते इंदिरा काॅम्प्लेक्स रोड काॅक्रिटीकरण पूर्ण व रस्ता वाहतुकीसाठी खुला.
फोवकांडा पिंपळ ते इंदिरा काॅम्प्लेक्स रोड काॅक्रिटीकरण पूर्ण व रस्ता वाहतुकीसाठी खुला.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ ते इंदिरा काॅम्प्लेक्स दरम्यानचा महत्वाचा रस्ता, प्रशासनाने कॉंक्रिटीकरण करून वाहतुकीसाठी खुला केला गेला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्याची दुरावस्था झाली होती आणि वाहतुकीस लोकांना त्रास होत होता. याबाबत माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी या संदर्भात सतत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.
आता जिल्हा नियोजन निधीतून हा रस्ता करून घेतला असून हा रस्ता दसऱ्यापूर्वी वाहतुकीस मोकळा करून दिलेला शब्द यतीन खोत यांनी पूर्ण केला त्यामुळे नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांचे आभार मानले या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त करून दिल्याबद्दल यतीन खोत यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)